Exhibitions

मला नेहमीच असं वाटतं कि एका अभिनेत्यासाठी रंगभूमीचं जे महत्त्व असतं तेच महत्त्व एका हस्तकलाकारासाठी प्रदर्शनाचं असतं! आपल्या कलेला मिळणारा प्रत्यक्ष प्रतिसाद ! कोणाचे मधाळ कौतुक, कोणाच्या डोळ्यांतलं कुतुहल , कोणाच्या उंचावलेल्या भुवया तर कोणाचे सपशेल दुर्लक्ष ! या सगळ्यातून खूप शिकायला मिळत असतं.. व्यावसायिक आणि तितकंच वैयक्तिक पातळीवरही.
आज हे सगळं सुचायचं कारण सोयराच्या पहिल्या वहिल्या कंझ्युमर प्रदर्शनाला नुकतीच 8 वर्षं पूर्ण झाली ! तेव्हा मी आणि मदतीला एक काकू अशा आम्ही दोघीच शिवायचो . जुलै 2014 मध्ये सोयरा एथनिक्स ची अधिकृत घोषणा केल्यानंतर लगेचच गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी माझ्या काही मैत्रिणींना घरी बोलावून शिवलेले सगळे कपडे दाखवले. सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे खरेदी करून माझा उत्साह वाढवला. आपली business idea "saleable" आहे हे समजलं. मग दिवाळीत परत घरातच हाॅलमधे दोन दिवसांचे प्रदर्शन लावलं. खिडक्यांना दोरी बांधून कपडे हँगर्सना आडकवले आणि table वर ॲक्सेसरीज मांडल्या. ओळखीतून लोक येत राहिले आणि हे प्रदर्शन आठ दिवस चाललं 😊 मग माझा हुरूप खूपच वाढला.
संक्रांतीनिमित्त मैत्रीण ग्रुपचं गांधी भवन परिसरात प्रदर्शन होतं. तिथे स्टाॅल बूक केला. आणि मग पहिल्यांदाच नावाचा बॅनर करून घेणे, visiting cards छापून घेणे, सगळ्या प्रॉडक्ट्स वर किमतीचे टॅग लावणं..
कामांची यादीच निघाली. अनेक गोष्टी नव्यानेच समजल्या , नवीन ओळखी झाल्या. एकदम छान अनुभव मिळाला.
तेव्हापासून आजतागायत वर्षातून 4 5 प्रदर्शने तरी होतात. आता डिस्प्लेसाठी छानसा स्टुडिओ असला तरी प्रदर्शनात जी मजा येते त्यामुळे परत परत नवीन ठिकाणी नवीन गर्दीत प्रदर्शन करायचा उत्साह वाटतो. कुठे किती आणि कोणता स्टाॅक न्यावा , कुठे कसा प्रतिसाद मिळेल काही सांगता येत नाही पण अनुभव मात्र प्रत्येक वेळेस नवीन आणि अविस्मरणीयच असतो . 🥰🥰
आजमितीस जवळपास 50 प्रदर्शनं झाल्यावर या आठवणींचा एक वेगळाच खजिना जमा झाला आहे !
आणि तो उत्तरोत्तर असाच वाढत राहो हीच मनापासून प्रार्थना 🙏🏻
Back to blog

Leave a comment

Please note, comments need to be approved before they are published.